स्वास्थ्य-बोध

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मिश्रितम् |

यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

 

शब्दार्थ: या किंवा त्या  कुठल्यातरी झाडाचं मूळ [घेऊन] त्यात हे नाहीतर ते मिसळलं [आणि औषध म्हणून] कुणाला पण दिलं [तर काय होणार? आजारी] असा [बरा] किंवा तसा [अजून खराब] होईल.

विवेचन: स्वस्थ्य्बोध च्या सुरुवातीच्या एका सुभाषितात उत्तम औषधीचे गुण सांगितले होते. ' बहुक्ल्पं बहुगुणं संपन्नं योग्यम् औषधं ' प्रस्तुत सुभाषितात शालजोडीतले टोमणे मारत सुभाषितकार काही सूचना करू इच्छितात.  त्यातील एक सकारात्मक अर्थ असा निघू शकतो कि ' नास्ति मूलं अनौषधम्' जगातील प्रत्येक वनस्पतीत काहि ना काही औषधी गुणधर्म असतातच. कुठलेही वनस्पतीचे मूळ टाकाऊ नसते. परंतु त्याच वेळी या सुभाषिताचा दुसरा सावध इशारा असा होतो नीट निदान;  योग्य औषध;  त्याची  प्रकृती  पाहून  उपाय  योजना  केली तर फायद्याची होते. 

कुठल्याही परिस्थितीत विचारपूर्वक उपाययोजना हवी. सध्या प्राप्त कोरोना जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर जगभरात जे काही औषधनिर्माण विषयात उत्पात सुरु आहेत त्यावर हे सुभाषित चपखल बसते. मग नवीन तयार होणार्या vaccines असोत, कि नवनवीन येणारी औषधे, नव्हे तर जुनीच औषधे नव्याने गुणकारी म्हणून कांगावा असो अथवा आयुर्वेद आणि होमिओपॅथि इत्यादी औषधांचा सर्व माध्यमांवर चालणारा अपप्रचार, या सर्वांसाठी एक उत्तम विचार प्रस्तुत सुभाषितात प्रतिपादित केला आहे. प्रत्येक वैद्यकाने सापेक्षतेने उपचार आणि रुग्णाने सुद्धा विचारपूर्वक औषध सेवन करावे.

 

डॉ. यशोधन बोधनकर