Corona - शेवट की नवीन सुरुवात?

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

आज एक व्हिडिओ बघितला ज्यात एक सुंदर हरिण समुद्र किनाऱ्यावर मुक्त संचार करत असतं. बागडत असतं. एरवी माणसाला घाबरून किंवा माणसाने पसरवलेल्या प्रदूषणामुळे ते हरिण अशा ठिकाणी फिरकत नसेल. पण आज मात्र ह्या लॉकडाऊनमुळे नुसतं ते हरिण नाही, पण इतरही जनावरे, पक्षी, इत्यादी जीवित एक वेगळाच दिवस जगत आहेत.

ह्या लॉकडाऊन मुळे माणसापेक्षा ह्या धरतीमातेला आणि तिची कदर करणाऱ्या पशुपक्ष्यांनाच जास्त फायदा झाला आहे. माणसाला पण झाला आहे पण तो शारिरीक पेक्षा मानसिक, वैचारीक आणि अध्यात्मिकरित्या जास्त झाला आहे असं मला वाटतं.

आज माणसं संपूर्ण वेळ आपल्या घरातल्यांबरोबर जास्त घालवायला लागले आहेत. वाहनांपेक्षा आपल्या मनाचा वेग वाढवायला लागले आहेत. इतरवेळी, एखाद्या zombie किंवा robot सारख्या वावरणारी ही आधुनिक माणसं आज जरा माणसात आली आहेत. स्वतःला वेळ देऊ लागली आहेत, स्वतःलाच स्वतःची पुन्हा ओळख करून देत आहे. कोणी आपल्यात दडलेल्या पेंटरला बाहेर
काढत आहे, कोणी आपल्यातला अवधूत किंवा महेश काळे चा नवा ध्यास करत आहेत. मुली चक्क चक्क साडीचा challenge एकमेकींना देत आहे. असो, त्यांनी कशाचाही challenge दिला
तरी आम्हाला आनंदच आहे. पुरुष मंडळी स्वयंपाकघरात प्रवेश करायला लागली आहेत. आई, बायको, बहिणीला रोज काय काम करत असतात, पण ज्याचा कधी कंटाळा करत नाही, हे समजून घेत आहेत आणि स्वतः त्यांना खायला करुन घालत आहेत.

इतरवेळी नुसती मोबाईल मध्ये डोकं खूपसून बसलेली तरुण पिढी (web series) आणि retired तरुण पिढी (news series) एकत्र बसून रामायण, महाभारत सारख्या बौद्धिक, धार्मिक आणि अध्यात्मिक मालिका बघत आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये निर्माण होणाऱ्या एक सुंदर नातं बघून डोळ्याचे पारणे फेडून देते आणि Generation Gap अशा पाश्चिमात्य संकल्पनांना फोल ठरवत आहे. आता तर पाश्चिमात्य लोकंसुद्धा आपला देशी नमस्कार करायला लागले आहेत. आपल्या संस्कृतीचा देशोदेशी गौरव करण्यात येत आहे. बाहेरून आल्यावर हातपाय धूवायच्या आपल्या सवयीला (ज्याचा आपण कंटाळा करायचो) त्यालाच आज जगाने डोक्यावर बसवलंय.

ऑनलाईन भेटीगाठी करून त्यातच खूश असणारी लोकं आज आपल्या मित्र मैत्रिणींना, नातेवाईकांना प्रत्यक्ष बघण्याकरिता, भेटण्याकरीता तळमळत आहेत. फेसबुक पेक्षा 'फेस'लूक किती महत्वाचा आहे हे आता लोकांच्या लक्षात यायला लागलंय. बाहेरच्या पिझ्झा पास्त्यापेक्षा, आईच्या हातच्या तूप साखर पोळीला जास्त चव आहे, हे आतापर्यंत बऱ्याच outgoing पोरांना लक्षात आलं असावं.

Nuclear शस्त्रांपेक्षा एका virus मध्ये किती ताकद आहे हे तर चीन ने दाखवून दिलंच. तसंच politicians च्या ओळखीपेक्षा, पोलिसांच्या लाठी मध्ये जास्त ताकद आहे हेही आपल्यामधल्या काही
कार्यकर्त्यांना लक्षात आलंच असेल. बाकी, ताटं वाट्यांच्या आवाजामध्ये, त्या एकीच्या स्वरांमध्ये आणि ते घडवून आणणाऱ्यामध्ये किती ताकद आहे हे तर सगळ्यांना कळालंच आहे.

एकंदरीतच, ह्या कोरोनाने लोकांना खाडकन जागं केलंय. त्यामुळे जगाचा अंत जवळ आला आहे, असं वाटणाऱ्यांनो पुन्हा एकदा विचार करा. की खरंच हा शेवट आहे की एक नवीन सुरुवात. ह्या Social Distancing मुळे, जणू Social Integrating वाढल्यासारखं वाटत आहे.

Regards,
Indraneel Kulkarni
9167200627