करोना

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

नमस्कार मी स्नेहप्रभा खोले वयं सत्तर आपणांस करोनावर लेख लिहून पाठवित आहे. मला विचार करायला व लिहायला प्रवृत्त केले त्याबद्दल धन्यवाद.

करोनाने जसे आपले हातपाय पसरवायला सुरवात केली तसे सरकारने अनेक उपाय  केले विदेश प्रवास करून आल्यावर तपासणी ,रेल्वे व बस सेवा बंद, वर्क  फ्राॅम होम, शाळा काॅलेज बंद वगैरे. शेवटी आन्तर्राष्ट्रीय व देशांतील विमानसेवा बंद. लाॅकडाऊन म्हणजे कारणाशिवाय घरातून बाहेर जाणे बंद .आता लाॅकडाऊन हा उपाय म्हणजे चातकासारखी पावसाची वाट पाहावी व मुसळधार पाऊस  पडावा किंवा बाॅसकडे अर्ध्या दिवसाच्या सुट्टीचा अर्ज करावा व  महिन्याभराची सुट्टी मंजूर करावी तसं झालं. आज आपण पाणीपुरी खावयाच का  म्हणून बायकोने विचाराव व पंचतारांकित हाॅटेल मध्ये जेवायला न्याव तसं  झालं.अचानक पैशांच्या पाऊस पडला व छप्पर फाडके दिल्यावर काय कराव  कळेना.एरवी मरायला वेळ नव्हता आता या वेळाचं काय कराव समजत नव्हत.  सर्व आवश्यक सेवा सोडल्या तर सर्व मंडळी घरी. आता सुट्टी म्हटले कि पिकनिक हाॅटेल व आऊटींगचे बेत सुरु होतात. पण लाॅकडाऊन म्हणजे घरातच  बंद रहायचे. कैदी झालो होतो बर कामाला बाई नाही हाॅटेल डाॅमिनो बंद. आता  घरातली भाजी पोळी जेवायची. मांसाहार पण नाही .शी किती कंटाळवाणे  जीवन.कुणालाही फोन केला कि मी किती थकते व खूप काम पडते असा तक्रारीचा  सूर असायचा. सर्व काम आपणच करायचं हे मान्य करायला थोडा वेळ गेला. पण एका  आठवड्यातच असे सूर येऊ लागले कि आपण काम केली कि किती स्वच्छ भांडी होतात  लादी चमकू लागते. पाणी व साबण बायका फार वापरतात. काम वेळेवर होत  व्यवस्थित होत व सर्वांना हातभार लावला तर अवघड नाही. घराबरोबर मन पण  निर्मळ झालं व्यायाम घडू लागला. बाईने केलेल व आपल्या हाताने केलेल्या कामताला फरक कळला.

सर्व कुटुम्ब एकत्र येउन वेगवेगळे पदार्थ करु लागले. वेगवेगळे  प्रयोग स्वैपाकघरात होऊ लागले. काही पदार्थ मिळायचे काही नाही पण जे आहे  त्यात काय करू शकतो हे शिकलो. कुटुम्ब एकत्र सहभोजन करत यातच किती आनंद आहे तो कळला.कॅरम, पत्ते ,बुद्धिबळ या सारखे खेळ खेळू लागले.कुटुम्बासाठी  वेळ मिळाला व आहे त्यात आनंदाने कस जगायचं हा विचार करू लागले. मानसिक ताण व त्याच्यामुळे होणारे विकार मधुमेह ह्रदयरोग ह्याच प्रमाण कमी झालं.  रस्त्यावर वाहन कमी म्हणून अपघात नाही व प्रदूषण नाही म्हणून श्वसन  विकार नाही. हवेतील ताजेपण शुध्दता जाणवू लागली.  पृथ्वीमातेने भरभरून मोकळा श्वास घेतला.कारखाने बंद मग त्याचे  सांडपाणी नदीत टाकले जात नव्हते. नद्या तलाव स्वच्छ निर्मळ झाले. जलचर  मुक्त बागडू लागले.पक्ष्याचा कलकलाट शहरात ऐकू येऊ लागला.हरण हत्ती वाघ  सिंह मुक्तपणे हिंडत होते माणसं घरावर बंद .करोडो रुपये खर्च करून गंगा  स्वच्छ होत नव्हता ती झाली प्रदूषण एकदम कमी झालं. जालंदर मधून दोन हजार  किलोमीटर दूरसंचार हिमालय दिसू लागला. मुंबईत मोर नाचतांना व फलेमिंगो  समुद्रतटाजवळ दिसले. निसर्गाने सांगितलेकि तुम्ही माझी किती हानी करता व  माझे स्वरूप कंस आहे. मिडीयाबद्दल काही प्रश्न उपस्थित झाले. सतत कोणत्याही देशांत  किती आजारी पडले किती मेले किती बरे झाले.हे सतत क्रिकेट स्कोअर सारखं  सांगत होते. मग मास्क क्वांरेटाईन व व्हेंटीलेटर कसे कमी पडतात .सतत  भयानक चित्र दाखवून माणसाच्या मनांत भीती निर्माण व्हायची . करोनाच भयानक  चित्र उभ करायचं करोना म्हणजे यमाकडे जाणण्याचा दरवाजा असं वाटू लागल  होत.जिथे मृत्युच प्रमाण प्रचंड आहे त्याचा विचार करुया. .अमेरिका व  युरोप इथे वयस्कर लोकांचे प्रमाण खूप आहे. मद्यपान करण प्रतिष्ठेच लक्षण  तर धूम्रपान हे अग्नीहोत्र सारखं सतत चालू.लठ्ठपणा,डबाबंद अन्नपदार्थ , व्यायामाचाअभाव घटस्फोट एकटेपण, रोग प्रतिकारक शक्ती कमी मग मृत्युच  प्रमाण अधिक होत.त्यात मधुमेह श्वसन रोग असेल तर साधा फ्लू देखील जीवघेणा ठरतो. त्यात लाॅकडाऊन म्हणजे स्वातंत्रावर घाला ठरतो त्यांना मग केवळ करोनामुळे मृत्यु हे बरोबर आहे का?  अशा वेळी मला वाटत कि प्रतिकार शक्ती कशी वाढेल याचा विचार  व्हावयास.आजही करोनावर अचूक औषध नाही.लसीवर संशोधन सुरु आहे.बाजारात  यायला वर्ष जाईल.अशावेळी आपली पारंपरिक औषध का वापरू नयेत?

गुळवेल, शकावर ,अश्वगंधा, जेष्टीमध, हळद, पिंपळी, आल अनेक पर्याय आहेत. होमेपथी निसर्गोपचार ,आयुर्वेद पर्याय ठरू शकतात. त्याचाउत्तम गुण येतो.आता सॅनिटायझरचा अतिरेक त्याने हातात साल निघतात व पुढे कॅन्सरच धोका.तुरटीच पाणी पर्याय ठरू शकत. सांध गरम पाणी प्यायल व गुळणे केले तरी घ्या स्वच्छ होतो. आम्ही व्हाट्स अप चा वापर किती करतो ?प्रंचड दुसरा शब्दच नाही.त्यातली माहिती गोळा केली तर पी एच डी मिळू शकते.अर्धी खरी कांही खोटी व माहितीच्या पूर येतो मग बटन दाबून पुढे पाठवली जाते. त्यात उपयोगी फार थोडी बाकी कचरा असतो.अफवा पसरविण्यात ह्याचा कुणी हात धरू शकत नाही. खात्री करून मग पुढे पाठवावी. करोनावर औषधांची माहिती पाहिल्यावर असं वाटू लागला कां सरकार याचं ऐकत नाही पटकन करोना बरा होईल? तेव्हा हे युद्ध आहे असे समजून जबाबदारीने याचा वापर व्हावा. आज दिवस रात्र वैद्यकीय कर्मचारी सेवा करत आहेत. स्वतच्या जीवावर उदार होउन आमच्या साठी काम करतात.अपुरे साधन अपुरी माणसं जेआहे त्यात उत्तम देण्याच्या प्रयत्न करत आहेत ,करणेत्याच्यावर दगडफेक ,अश्लील शब्द ,मारहाण व अनादर करणे कुठल्या संस्कृतींत बसते.देवा प्रमाणे जीव वाचवणार ते शत्रु प्रमाणे हल्ला केला हे मनाला बोचले. पहिल्यापासून रोजंदारीवर काम करणारे यांच कंस होईल ही चिंता वाटत होती. स्वाभिमानाने कमावून खाणारा मजूर वर्ग भीक मागणे न पटणारे आहे. उपाशी लहानमुलांसह हजारो मैल लांब निघालेल्या मजूरांच्या कथा ह्रदयद्रावक आहेत? हे थांबवता आल नसतं का हा प्रश्न सतत येतो. लाॅकडाऊन करुन काय साध्य होणारं ? परत सर्व सुरु झालं कि मजूर लागतील मग समाजाने ही जबाबदारी घेतली असती तर कदाचित सुटला असतां प्रश्न. मजुरांना कामांची हमी व तात्पुरती जेवणखाण्याची सोय करायला हवी होती. आम्ही भारतीय दिनचर्येचे ऋतुचर्या पालन केले तरी उत्तम तब्येत राहील. ध्यान धारणा ,प्राणायाम ,पूजा प्रार्थना याची संगत जोडवी पाहिजे.कुटुम्ब व्यवस्था, समाज व्यवस्था वैयक्तिक स्वच्छता ,नाती ,ही आमची बलस्थाने आहेत. समाजातील एकमेकाविषयी असणारच प्रेम जागण्याचे बळ देतो.सहनशक्ती हाआमचा गुण कारण आहेर मनोवृत्ति .जगात मृत्युच तांडव या बळावरच रोखू शकलो.

करोनाने अनेक धडे आम्हाला दिले आहेत. सार्वजनिक स्वच्छतेत आम्ही थोडे कमी पडतो ती सुधारु.उगाचच पळत्याच्या मागे धावतांना खूप काही हरवतो त्यांवर लक्ष ठेवू.स्वतच्या आरोग्याला प्रथम स्थानावर ठेवू. त्यासाठी व्यायाम, योग्य आहार, सकारात्मक विचारसरणी, प्रार्थना, आमच्या जीवनाचा भाग बनवू. मग करोना येऊ दे तीचा भाऊ येऊ दे लढायला तयार आहेत.

स्नेहप्रभा खोले