कोरोना शाप की वरदान

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

2020 साल उजाडले पण महिन्याच्या अखेरीस 30 जानेवारीला कोरोना चा पहिला रुग्ण आढळून आला. भीती ताण व थोडासा दिलासा यामध्ये फेब्रुवारी महिना कसाबसा बातम्यांच्या सहवासाने निभावला. पण पुढे परिस्थितीने वेगळेच स्वरूप धारण केले पूर्ण विश्वालाच कोरोनाने व्यापले. कोरोनाच्या वणव्याने अचानक वादळ आल्यावर झाडावरची फळं फुलं टपटप खाली पडावीत तसं कोरोनाने अनेक जिवाणूंचा जीव घेतला. ह्या विषाणुने मृत्यू दाखवला. साऱ्या विश्वाला आपल्या कवेत घेणाऱ्या विषाणूने जनजीवन विस्कळीत केले. समाजजीवनाचे चित्रच बदलून स्वतःचे संक्रमण वाऱ्यासारखे पसरून भीती, उदासिनतेचे सावट सर्वत्र पसरून दिले. वेगाने पसरणाऱ्या विषाणूच्या संक्रमणात 22 मार्च पासून टाळेबंदीला सुरुवात झाली. जनतेने आखलेल्या नियोजनपूर्वक कार्यक्रमालाही टाळेबंदीने बंदिस्त केले. एखाद्यावर टाळेबंदी सोबत दिलेली विचारपूर्वक नियमावली stay home safe home. यंत्राप्रमाणे धावणाऱ्या मानवी प्राण्यात असहाय्यपणे घरात थांबणे व काळजी घेणे यापलिकडे काहीच नाही विषाणू चोरून लपून छपून पाठलाग करतोच आहे. कोणी विनोदाने, कोणी खेदाने, कोणी कंटाळून, आपल्या कल्पकतेने व्यक्त होताना मनामनातील कोरोनाच्या भितीने अंतरंग थरकले असल्याचे जाणवत आहे. कोरोना कोई रोड पे नही आना अशा वचनांकडे पाहिल्यास अशाही परिस्थितीत युक्तिवाद उभारी देण्यासाठी उभा असल्याचे जाणवून देते.

कोरोनाने सर्वांनाच हवालदिल केले. कुटुंबातील सर्व सदस्य घरी एकत्र आले घराला घरपण आले. शिवाय नाती, माणुसकी, संवाद दृष्टीआड झालेल्या बाबींना सांभाळून कोरोना लागण लवकर लवकर संपुष्टात यावी म्हणून चौकटीतच एकत्र नांदत असल्याचे दिसून येत आहे, धावपळ, कामाची व्यस्तता व त्यामुळे मनावर येणारा ताण या सर्वांचा भार हलका करण्यात वैश्विक विषाणूने सर्वांना एकत्र आणून सृष्टीचे चक्र परत मार्गांन्वित केले. परंपरा, चालीरीती, सण उत्सव, आवड-निवड, सुखदुःख, अनुभव यातून होणाऱ्या संस्काराच्या भूतपूर्वतेत थोड्या प्रमाणात का होईना जनता मनाने गुंतली गेली.

टाळेबंदी नंतर साऱ्या घराची दारे बंद केली. बंद दारातूनही नात्याची ही बंद दारे सहजतेने मोकळी केली. माणूस माणसाजवळ आला तो कोरोनामुळे. साऱ्यांचीच चिंता वाढीस लागत असताना स्टे होमचा नियम बहुतांशी पाळला गेला. सुविधांची उपलब्धी शासन देण्यामध्ये तत्पर होते ही जनतेची मोठी जमेची बाजू आहे.

समंजस जनताही सहकार्यात मागे पुढे पाहत नाही. चरितार्थासाठी माणूस यंत्रवत झालाय. कर्तव्य, जबाबदारी, समस्या तर आहेतच त्यातच अनाकलनीय अशा विषाणूचा शिरकाव. घरातील वाढते वास्तव्य त्यामुळे मनाला आत्ममग्नता येऊन तो अंतर्मुख झाला. रेंगाळलेली कामे पुढे रेटून एक समाधानाचा श्वास बाहेर टाकण्याचा आनंद मिळवला. भावनांना नकळतपणे बोलकं करताना संवाद, प्रेम, मैत्री, नातं, माणुसकी, जागी होऊन जगण्यातील जिवंतपणा कोरोनाच्या संक्रमणाने जागा झाला.

भीतीपोटी हवालदिल झालेल्या ज्येष्ठ, तरुण व बालमनात परिस्थिती व सद्यस्थितीवर विचार करण्यास परिस्थितीने प्रवृत्त केले. संवेदनशील बालमनावर तर अनुभवी ज्ञान असूनही कोरोनाच्या विविध कलाकृती तयार करून मनातील सर्जनशीलतेला वेगळा आयाम देत असल्याचे दिसते ही बाब फार प्रशंसनीय वाटते. विषाणूला पळवून लावण्यासाठी टाळेबंदीच्या काळात टाळ्यांचा गजर, शंखनाद करण्यामागचा उद्देश, तर संध्याकाळी ज्योत पेटविणे गो-कोरोनासाठी केलेली ही कृती संघटन शक्तीचे प्रतीक तर आहेत शिवाय रुग्णांना एक दिलासा मिळावा म्हणून केलेली प्रेरणा पूजा होय.

परत वाढीव ताळेबंदी आली, जनतेमध्ये चिंता वाढीस लागली. कोरोना काळात सुरुवातीपासूनच प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी, पोलीस त्यांचे सहाय्यक कर्मचारी यांच्या तत्पर सेवेने समाजाविषयीची निष्ठा, कर्तव्य भूमिका, जबाबदारीची जाणीव, अहोरात्र सेवा देत असतांना सेवेतील त्यांची तत्परता म्हणजे सेवा हाच खरा धर्म साने गुरुजींच्या वचनाची प्रचिती येत आहे. हे भारतभूचे सच्चे खंदे आधारभूत घटक असून त्यांच्या कार्यामुळेच प्रत्येक जण सेफ होम आहे. कामा परतीची त्यांची निष्ठा आपल्या सुरक्षिततेची टाकत आहे असे अभिमानाने म्हणू.

मोठ्या प्रमाणात प्रश्न उभा राहिला तो हातावर पोट भरणाऱ्या मजुरांचा हाताला काम नाही पोटाला भाकरी नाही भुकेच्या मनस्थिती ने हवालदिल झालेला मजूर हक्काच्या भाकरी पासून दूर गेला कामाच्या ठिकाणाहून घरी परततांना त्यांची झालेली अवस्था पाहवत नाही.

अन्नदाता राजकीय नेते प्रशासकीय अधिकारी यांच्या मदतीने प्रश्न मार्गी लागत आहे अन्यथा त्यांनी स्वखुशीने केलेली मदत माणुसकीचे द्योतक आहे. विषाणू छोटाच पण त्याने नांदत्या जगातील चित्रच बदलून टाकले वर्तमान काळाच्या अवस्थेला सोबत करत भविष्यात अजून काय बदल होईल ह्यासाठीच ईदृष्टी सकारात्मकच ठेवावी लागणार. ही वेळ राहणार नाही काळाबरोबर तिचाही ही रास होणार आहे परत कोरोना हरणार आहे कारण हिरोशिमालाही फुले आले. कोरोना नेही लढण्याची ताकद दिली म्हणून ते आपल्यासाठी एक वरदान ठरल्याचे म्हणता येईल. अकल्पित असे या संकटाने विस्कटलेली घडी परत जागी आणण्यासाठी तिला फिरवा देण्यासाठी व परत आरोग्यपूर्ण जीवनाचा प्रारंभ केव्हा होईल यावर एकच मोठा पर्याय म्हणजे सकारात्मक दृष्टिकोनाचा स्वतः आत्मनिर्भर होणे काळजीपूर्वक ता अंगी राखण्याची गलज आहे.

शिवाय शांत आनंदी प्रसन्न उत्साही राहून येणाऱ्या प्रसंगाशी दोन हात करण्याची ताकद ठेवून सक्षमपणे सामोरे जाण्याची आहे कुठल्याही आव्हानांना निर्भयतेने सामोरे जाण्यास मनाची शरीर रस्त्याची गरज आहे कोरोना सामाजिक जी विषाणू घातक तर आहेत साऱ्या नकारात्मक बाजू घेऊन आपल्याशी तो दोन हात करताना प्रदूषण नद्या समुद्राची स्वच्छता राखली गेली निसर्ग जवळाला रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण घटले सकाळी छोट्या पक्षांचा चिवचिवाट घरापर्यंत येतो मनाने दूर गेलेल्या माणूस जवळ आला खरच बोलू लागले आरोग्य जागृती होत आहे स्वच्छता स्वयंशिस्तीने सोबत विषाणू निसर्गाने नियतीला दिलेला शाप असला तरी जगण्याचे सामर्थ्य स्व जागृती व अंतर्मुख होण्यास शिकवले परिवर्तन हा विश्वाचा नियम आहे परिवर्तनाला धैर्याने सामोरे जा गीतेची शिकवण आत्मसात करण्याची गरज आहे

व्यापार व्यवसाय व्यवहार वैद्यकीय मदत त्यात नाकाबंदी टाळेबंदी व वेळेच्या व्यवस्थापनामुळे होणारी धावपळ हे चित्र अस्वस्थ मनाला यातना देणारे. सोबत रणरणते ऊन महामारी तिचे गांभीर्य लक्षात नसते सराईतपणे वावरतांना दिसणारा वर्ग तत्परतेने प्रसंगाला सामोरे जाणारा सेवाधारी वर्ग यांच्यामुळे होणारी दमछाक विषाणूचे आकस्मिक प्रगट होणे जाणारा या साऱ्या बाबी लक्षात घेता प्रतिकूल परिस्थितीनुसार राहणे हेच योग्य.

प्रवाहाविरुद्ध जाऊन कार्यभाग साध्य होत नाही महामारी जगभरातील नांदते चित्र बदलून टाकले. वर्तमान काळाच्या पुस्तक केला सोबत करत भविष्यात काय बदल होतील त्याकडे सकारात्मक दृष्टी ठेवावी लागेल विस्कटलेली घडी जागेवर आणण्यासाठी स्थिरत्व कसे देता येईल. विश्व आरोग्य किंवा नांदेड यावरील पर्याय म्हणजे सकारात्मक दृष्टीचा शिव शांत आनंदित प्रसन्न उत्साही मनाने येणाऱ्या प्रसंगाला सक्षमपणे स्वीकारणे होईल नवरचना करण्याचा आलेख तयार करून भारतमातेसाठी जय हिंद म्हणण्याची ची ताकद देऊन कोरोना वरदान शापही आहे सपाचा युगांत होऊन मानवी मनात हसू खुलावे हा आशावाद पूर्णत्वास नेण्यासाठी तो फिर मुस्कुराये गी दुनिया असे म्हणतात कोरोना वरदान आहे असे म्हणू.

मंगल कुलकर्णी

मल्हार

गुलमोहर कॉलनी,

कॅम्प अमरावती