कोरोना मानव निर्मित विधी घटना

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

2020 हे साल अगदी आबालवृद्धांच्या ही लक्षात राहील कोरोना नामक एका जीवघेण्या व्हायरसने जगात हाहाकार माजवला. ज्याच्या त्याच्या तोंडी एकच शब्द कोरोना कोरोना. टीव्ही लावू म्हटलं तर एक येणार कोरोना. मोबाईल वर बोलू म्हटलं तर कोरोनाबद्दलच ऐकायला मिळणार. काय आहे हा कोरूना covid-19. हा एक महाभयंकर साथीचा रोग आहे एकाबरोबर अनेकांना होणारा आणि अद्यापि औषध नसल्याने एकाबरोबर अनेकांना मृत्यूच्या खाईत लोटणारा.

नाना तऱ्हेचे विचार डोक्यात येतात. बाळाचा जन्म होतो तेव्हाच त्याच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतचा जीवनपट विधीने लिहिलेला असतो. भलेही आपल्याला वाटते की आपण असे करू तसे करू पण देवाजीच्या मनात असेल तेच घडते असा अनुभव येतो. तसेच सृष्टीच्या उत्पत्तीपासून तोंडली होईपर्यंत काय काय घडामोडी घडणार किंवा कुठेच कसे उत्पात घडतील हेही विधिलिखित असावे कारण यापूर्वीही कोरोना covid-19 प्रमाणे अनेक रोग येऊन गेले जसे की प्लेग डेंग्यू स्वाईन फ्लू देवी पोलिओ इत्यादी.

उत्पत्ती आणि प्रलय हा तर विधीचा खेळ आहे असे म्हणतात पण भूकंप महापूर सुनामी अवर्षण चक्रीवादळ यात अपरिमित जीवित हानी होते तसेच रोज जगाच्या पाठीवर एकीकडे जन्म होतात तर दुसरीकडे मृत्यूही होतात मी घटनेला फक्त निमित्त हवे असते त्यासाठी चीनला शोधले विधीने तेथून कोरणा ची सुरुवात झाली हा विषारी विषाणू तामसी खाण्यापिण्याचे आला आहे किंवा त्यामागे काही राजकारण आहे व त्यासाठी तो बनविला गेला आहे असे दोन विचारप्रवाह आहेत पण एवढे नक्की की कोरोनाव्हायरस हा भराभर जगभर पसरत आहे चीन इटली अमेरिका येथे कोरणा मुळे जास्तीत जास्त मृत्यू झाले आणि पाहता पाहता अनेक देशांनाही त्याने गिरले त्यातून भारत सुटला नाही. भारताच्या प्रत्येक राज्यातही त्याचा शिरकाव आहे महाराष्ट्रात जास्त आहे. कोणाचे हे आक्रमण थांबवण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले. शाळा विद्यालय कार्यालय देवालये मार्केट बंद झाले या युद्धाचे प्रधान सेनापती भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी भारतातील जनतेला 21 दिवस घरातच राहण्याचा मोठ्या कळकळीने टीव्हीवरून संदेश दिला. त्याचबरोबर कोरूना पासून स्वतःला व देशाला वाचवायचे कसे असेल तर स्वतः धुळा मास्क बंधा या दोन्ही गोष्टी प्राधान्याने करावयाची सांगितल्या. 21 चा आकडा मोदीजींनी नाका घेतला त्यावर थोडे मंथन झाले 21 दुर्वा 21 मोदक 21 चतुर्थी म्हणजे गणपतीचे संबंधित म्हणजेच करण्याचे हे संकट निवारण्यासाठी विघ्नविनाशक गणेशाची आराधना करण्याचा संदेश असावा असे वाटले शेवटी संकटसमयी देव आठवतोच ना हे झालं अध्यात्मिक कारण पण त्यामागील शास्त्रोक्त कारण म्हणजे करुणा हा विषाणू सतरा अठरा दिवस जिवंत राहतो घरातच राहिल्याने त्याच्याशी संपर्क येणार नाही व तो मरून जाईल.

19 मार्चला संध्याकाळी पाच वाजता सर्वांनी घराबाहेर येऊन थाया वाजवण्याची सूचना मोदीजींनी दिली होती यामागील कारण म्हणजे आपण सर्व घरात सुरक्षित राहतो सीमेवर जवान लढत असतात तसेच कोणाच्या युद्धकाळात आपण घरात सुरक्षित राहावे म्हणून डॉक्टर्स नर्सेस पोलीस स्वतःचा जीव धोक्यात घालून कार्य करीत आहेत त्यांच्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांना शाबासकी देण्यासाठी आपण सर्वांनी टाळ्या वाजवल्या यातील अध्यात्म असावं की नादब्रम्हा ने त्या परब्रह्माला जागवणे असेल पाच मे ला रात्री नऊ वाजता आपण सर्वांनी पंतप्रधानांच्या सूचनेनुसार घरासमोर दिवे लावले रात्रीच्या अंधारात सर्व भारत प्रकाश मे झाला होता आम्ही सारे एक आहोत हा संदेश या झगमगत्या प्रकाशाने तो तेजोमय अग्निदेव भारतावर प्रसन्न व्हावा हा एक अध्यात्मिक विचार

सुरुवातीला घरातच राहण्याची शिक्षा वाटली पण नऊ महिने गर्भात कसे राहिलो होतो स्वातंत्र्यवीर सावरकर अंदमान च्या अंधारकोठडीत कसे राहिले असतील या कुठेतरी वाचलेल्या विचारांनी मनाला धीर आला आपल्या घरात सर्व सुविधा आहेत सर्व एकत्र आहोत सकारात्मक दृष्टीने याकडे बघितले तर घरात राहण्याच्या या काळात आपण खूप काही शिकलो पण करू शकलो या काळात अनेक कवींनी सुंदर अप्रतिम काव्य स्फुरले तर लेखकांची प्रतिभा लेखणीच्या द्वारे जागृत झाली विनोद वीरांनी हे सारे विनोदाने घेऊन बसवण्याचे काम केले निर्णय रेसिपी करून पाहण्यात गृहिणींची अहमहमिका सुरू आहे त्यामुळे हॉटेल बंदची जाणीवही होत नाही हॉटेल बंदमुळे घरच स्वच्छ सात्विक जेवण करण्याची सवय लागली मार्केटिंग बंद मुळे अपरिग्रह वृत्ती जोपासली जात आहे देऊळ बंद कशासाठी देव म्हणतो तुमच्यातच देव आहे त्याचा शोध ह्या सर्वांमध्ये देव पहा घरात राहून माणुसकी जोपासा सर्वांशी प्रेमाने व सहकार्याने वागा आजी-आजोबा सर्वांनी एकत्र गप्पागोष्टी करा एकत्र जेव्हा एकमेकांच्या आवडीनिवडी जोपासा अशा या सदाचरणातच देवदर्शनाचा आनंद मिळणार आहे घरातच देऊळ बनवा कोणाच्या लॉकडाऊन काळात स्त्री पुरुष समानता पहायला मिळत आहे भांडी घासण्याची स्वयंपाक करणे झाडे ही कामे पुरुष करताना दिसत आहेत

सतत हात होण्याची चांगली सवय आहे शिंकताना खोकताना रुमाल तोंडावर ठेवण्याची कुठेही न थुंकण्याची सवय ह्या सर्व सेवांची भारतीयांना खरच नितांत गरज होती.  सर्वसामान्यांपेक्षा लोक डाऊन चा परिणाम गरिबांवर गुरुजी रोटी वाले हात मजूर तीच कमावणे पण तेच खाणे यांच्यावर जास्त झाला सरकारने त्यांच्या राहण्या-जेवण्याची सोय केली सामाजिक कार्यकर्त्यांनी ही त्यांच्यासाठी अन्नछत्र चालू केले लोक डाऊन मुळे अनेक हृदयद्रावक घटना घडल्या लांबलचक अंतर पायी चालून घरी आलेल्या मुलाला प्रत्यक्ष आईने घरात घेतले नाही कमावणाऱ्या एक गावी तर त्याची बायका-पोरी दुसऱ्या गावी वाहने नाहीत व जिल्हाबंदी अशावेळी हे मजूर पायीच जायचे पण सरळ मार्गाने न जाता रस्ता चुकवत जायचे रेल्वे तर बंदच आहे असे समजून औरंगाबाद जवळच्या गावाहून सतरा अठरा मजूर पायी निघाले खूप थकल्यामुळे ते रेल्वे रुळाच्या पटरी मध्ये झोपले त्यांना झोप लागून गेली आणि म्हणतात ना मृत्यू सुद्धा कुठे तसा केव्हा येईल सांगता येत नाही नेमकी मालगाडी त्या वारूळावर गेली अन हे सतरा-अठरा मजूर त्या गाडीखाली वरून पडले फार मोठी हृदय विदारक दुर्घटना विधी घटना कुरूना होऊ नव्हावे तर कोणाच्या लाडावून मुळे.

कोरोनाच्या लागवडीमुळे सरकारवर आर्थिक बोजा खूप पडला आहे कुराणातील एक गमतीशीर घटना दारूची दुकाने उघडली लंबे लोक डॉन अंतर उघडल्याने दुकानासमोर लोकांनी ही गर्दी केली होती अर्थात यातून सरकारला भरपूर पैसा मिळाला मोठ-मोठ्या सिनेकलाकार यांनीही पंतप्रधान निधीला लाखोनी डोनेशन दिले. आपल्या आपल्या गणपती प्रमाणे प्रत्येकाने देशासाठी धनाचा त्याग करू या. 

मेडिकल सायन्सला कोरोना एक जबरदस्त आव्हान आहे औषधांचे संशोधन सुरू आहे आणि ते सापडणारच आहे तोपर्यंत बहुतेकांनी आजीबाईच्या बटव्यातील औषध घ्यायला सुरुवात केली आहे कलमी मीरा लवंग काय म्हणू का तुळस या घरातल्या वस्तूंचा कडा करणे व तो घेत राहणे गार गल करणे रात्री झोपताना हळदीचे दूध घेणे आयुर्वेदातही रोग होऊ नये यासाठी व रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास बरीच औषधे सांगितली आहेत प्राणायाम अग्निहोत्र करण्यास सांगितले आहे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास व दिलेल्या सूचना प्रत्येकाने पाळल्या तर आपण वाचू आणि इतरांनाही वाचवू ह्यात स्वार्थही आहे आणि परमार्थ ही आहे दुसऱ्यांसाठी त्यात करण्याचा विचार उदात्त आहे व तीच आपली संस्कृती आहे.

मला असं आठवतं पूर्वी एका वर्षे पाऊस नव्हता पाऊस पडावा म्हणून वैज्ञानिक पद्धतीने कुठेतरी मोजक्या जागेवर तो पाडला गेला पण तेवढ्या पावसाने कुठे काय होणार मग सगळ्यांनी देवाकडे धाव घेतली यज्ञ केले देवळा देवळातून देवांना पाण्यात ठेवण्यात आले तसे कुरणाच्या या काळात जो तो आपापल्या परीने हे संकट कळावा म्हणून देवाची प्रार्थना करीत आहे. विष्णुसहस्त्रनाम राम रक्षा मारुती स्तोत्र म्हटल्या जात आहे श्री मंगलनाथ महाराजांनी पुरणाची ही महाभयंकर आपत्ती नष्ट व्हावी या हेतूने भव्य शतचंडी महायज्ञ चे आयोजन केले आहे. त्यासाठी दुर्गा सप्तशती ची पारायणे सुरू आहेत वंदनीय श्री संत अच्युत महाराजांच्या प्राकृत मराठीतील दुर्गा सप्तशती च्या पुस्तकातील फलश्रुती श्लोक आहे.

त्रिविध उत्पात जे का। महामारी भयप्रद।

महात्मे वाचता म्हणजे शांत होतील आपदा।

दुर्गा सप्तशती चा सारांश म्हणजे वेळोवेळी महिषासुर चंड मुंड रक्तबीज शुंभनिशुंभ अशा महाबलाढ्य राक्षसविरुद्ध लढण्यासाठी देवांनी अपराजिता देवीला आवाहन केले. देवांच्या सहाय्यार्थ देवी धावून आली तिने असुरांचा नाश केला कोरोना नावाच्या राक्षसाचा नयनाट देवी नक्कीच करणार

कोरणा येण्याआधी कोणाकोणाचे लग्न ठरले होते एप्रिल-मे मधील लग्नाच्या तारखा ठरल्या होत्या कोणाच्या ट्रीपचे रिझर्वेशन झाले होते सालाबादाप्रमाणे गंगा दशहरा मध्ये यावर्षी 19 मे 2020 ला पच्चीस परिवारातील भाविक महाराजांचे परमशिष्य हभप सचिन देव यांच्या सुश्राव्य वाणीतून भागवत ऐकण्यासाठी पंढरपूर येथे जाणार होते पण कोरूना मुळे सर्व स्थगित झाले यालाच म्हणतात विधीलिखित.

आमची आई आम्हाला सांगायची की लेखी ची सात आली होती तेव्हा आम्ही सर्व आपापली घरं सोडून गावाबाहेर झोपड्या टाकून राहिलो होतो हे आईने अनुभवले 1966 स*** तांदूळ पिकला नव्हता रोज नव्हे तर फक्त सोमवारी एक दिवस भात करायचा लग्नाच्या पंक्तीत हात वाढत आहे का हे पोलिस पाहून जायचे हे मी अनुभवले काल-परवा आमच्या शेजारी डिलिव्हरी झाली बाळ मोठं झाल्यावर त्याची आई त्याला सांगणार तुझा जन्म झाला ना तेव्हा कोरूना होता मग कोणाची तिने अनुभवलेली ही माहिती ती त्याला सांगणार प्रत्यक्ष अनुभवलेल्या कोरोनाचे आपण साक्षी आहोत.

सुट्टीत वारंवार काही ना काही बदल घडत असतात बघाना सर्व काही छान सुरू होते पण अचानक दृष्यच पालटून गेले. निर्मनुष्य रस्ते गर्दीचा कोलाहल नाही वाहनांचे आवाज नाही घराबाहेर डोकंवावे तर जिकडेतिकडे शुकशुकाट नकोशी शांतता हे कुरणातील लोक डाऊन त्याच्या मर्जीशिवाय झाडाचे पानही हलत नाही तोच करतो करून घेतो म्हणूनच म्हणायचे कोरदा सृष्टीतील मानवनिर्मित पण विधिलिखित एक महाभयंकर स्थित्यंतर होय जगाच्या इतिहासात याची नोंद होणार हे निश्चित.

प्रतिभा पानट

बालाजी प्लॉट अमरावती