कोरोना लढाईत शूरसैनिक - पोवाडा

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

प्रस्तावना – कोरोना विरुद्धच्या या लढाईत विजयी होण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील सर्व लढवय्यांचे अभिनंदन करण्यासाठी सदर पोवाडा श्रीमती सीमा विजय पत्की यांनी लिहीला असून सादर केलेला आहे.

वंदन गजाननाला ऽऽऽऽ

 

मायभूमी भारतमातेला

रझिसी नित्यजनतेला

कसा कोठून विषाणू आला

कोरोना ग्रासीत सकलाला

कोरोना लढाईत शक्ती देई शूर सैनिकाला... जी जी जी

शूर सैनिकाला जी जी जी।।धृ।।

 

हा भस्मासुर घातकीऽऽऽऽ

हा भस्मासुर घातकी

करी घाला श्वसनावती

किती क्लेश ज्वर शरीरासी

मग अंत समय ही झडकरी येई रुग्णासी जी जी जी ।।1।।

 

करी गुप्तरुपे हा घाला ऽऽऽऽ

नेई त्वरे तो यमसदनाला

प्रतिबंध करोना करण्याला

सैनिक सिद्ध लढण्याला

करु गौरव त्यांचा भला

डॉक्टर शिपाई नर्सेस सारे

लढण्यास सिद्ध ते झाले

संकटी स्वतःला नित्य घालती सारे जी जी जी ।।2।।

 

पोलीस शिपाई अधिकारी सारे ऽऽऽऽ

बाजी जीवाची लावती बरे

रात्रंदिन कार्यरत तेही

घरदार विसरुनी पाही

सेवाव्रती होती सर्वही

जयघोष करुया शूर सैन्याचा जी जी जी ।।3।।

 

करताला करूनी समयी ऽऽऽऽ

दिप अनंत पेटवू झणी..

वैश्विक महामारी ही

आली अचनाक भूवरी

ना विचलित आम्ही होऊ

धैर्याने सामना करु

करु नष्ट विषाणू प्रयत्न करुनी नाना जी जी जी।।4।।

 

अंगनवाडी सेविका साऱ्या ऽऽऽऽ

आशा वर्कर्स कार्यकरी स्त्रीया

सफाई कर्मचारी पाही

तळहाती शीर घेती तेही

अहोरात्र कार्यरत पोलीस कर्मचारीही जी जी जी।।5।।

 

डॉक्टर आरोग्य परिचारिका ऽऽऽऽ

दिनरात कार्य तत्परता

आरोग्य जागृतीसाठी

नित घरात रहा म्हणती

आरोग्याची काळजी मोलाची

मास्क लावा बाहेर जाताना

सुरक्षित अंतर ठेवाना

हे नियम रक्षण करतील अंतरी जाणा जी जी जी।।6।।

 

देशाला गरज धान्याची ऽऽऽऽ

देशाला गरज पैशाची

व्हा उदार पै पै द्याना

संकटी देश रक्षणा

मदतीचा हा उचलाना

ही विनंती करुया आज देश बांधवांना जी जी जी ।।7।।

 

अत्यावश्यक सेवालागी ऽऽऽऽ

धनधान्य भाजीपालाही

कार्यतत्पर बँक कर्मचारी

अत्यावश्यक सेवेकरी

प्राणपणाने लढती तेही

अभिनंदन कौतुक करु आम्ही उतराई जी जी जी।।8।।

 

हात धुवा वीस सेकंद

कोरोनाला होई प्रतिबंध

सॅनिटायझर नि साबण

करी नाश कोरोनाचा छान

स्वच्छतेचा मुलमंत्र हा

घरी रहा सुरक्षित रहा

करु रक्षण जीवन हीच प्रतिज्ञा जाणा जी जी जी

 

सीमा विजय पत्की