कोरोनातील चेहरे

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

कोरोनातील चेहरे....

पृथ्वीवरचे जगअतिशय सुंदरआहे. या जगाचाआकंठअसाअनुभव मनुष्याशिवाय दुसराकोणताही प्राणी घेऊ शकतनाही. मनुष्य या बुद्धिमान प्राण्याने स्वबळावर स्वकष्टाने केलेल्या वैज्ञानिक प्रगतीद्वारे पृथ्वीवरील जीवन खूपच सुलभकेलेआहे. पण हे करतांनाआपण पृथ्वीचा चेहरामोहरा बदलतो आहे याकडे त्याने सर्रास दुर्लक्ष केले. निसर्गाच्या चक्रातअडचणआणली तर तो कोपतो आणि त्याची परतफेड मानवाला करावी लागते.


आज जगभर पसरलेल्या कोवीड-१९ यामहामारीने या नियमाची जाणीव आपल्याला करून दिली आहे असे म्हणावे लागेल. कोरोना विषाणूने मानवी समाजात खूप उलथापालथ घडवून आणली आहे. जगभरातील शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, राजनितीज्ञ, अर्थतज्ञ सर्वांनाअक्षरशः खडबडून जागेकरून कामाला लावले आहे. कारण हा कोरोना विषाणू दिसायलाचनाही तर त्याचा संसर्ग हि भयंकर आहे. कोरोना संक्रमित व्यक्तीच्या उच्छ श्वासाद्वारे हजारो कोरोना विषाणू बाहेर हवेत फेकल्या जातात. जेव्हा जवळचीव्यक्तीअश्या हवेत श्वास घेते तेव्हा कोरोना विषाणू त्या व्यक्तीच्या नाकातआणि घश्यात शिरतात. तेथून श्वासनलिकेत असलेल्या ACE2 कोशिकांद्वारे पेशींमध्ये शिरतात, एकदा ते पेशींमध्ये शिरले कि एक प्रकारचे नेगेटिव्ह प्रोटीन तयार करून स्वतःसारखेच असंख्य कोरोना विषाणू निर्माण करतात. व्यक्तीची प्रतिकारक शक्ती कमी पडली तर पुढे फुप्फुसांवर हल्ला करतात. परिणामी रुग्णाला ऑक्सिजनची कमतरता जाणवते. योग्यते उपचारवेळीच मिळाले नाही तर रुग्ण दगावू शकतो. या विषाणूलावेळीचआळा घालू शकतीलअशीऔषधे आणि लस अजून तरी उपलब्ध नाहीत.कारण हा नवीनच प्रगटलेला विषाणू आहे.


कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वप्रथमआशिया खंडातील चीन देशातआढळूनआला. साधारणपणे २०१९ मध्ये डिसेंबरच्या सुरवातीला कोरोनाचे रुग्णआढळलेआणि चीनमध्ये मृत्त्यूचे तांडव सुरुझाले. आता मे-२०२० पर्यंत कोरोना महामारीनेआशियाच नाहीतर अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिका खंडातही उत्पात मांडला आहे.

आता इथूनआपण "कोरोनातीलचेहरे" यामुख्य मुद्द्याकडे वळू या. कोरोना विषाणू हा मानवनिर्मितअसून प्रयोग शाळेत निर्माण करण्यात आला असा विश्वास आज जोर धरलेला दिसतो. चीनमधील वुहान प्रांतात जिथे सर्व प्रथम कोरोनाचा उद्रेक झाला तिथे वुहान इंस्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजि मध्ये हा विषाणू व्हायरोलॉजिस्टने निर्माण केला असा आरोप अमेरिके चे राष्ट्र्याध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ह्यांनी जाहीर पणे केला. ह्या आरोपात जर तत्थ्यअसेल तर असा विनाशकारी रोग जंतू का निर्माण करावासा वाटला? आणि इथेच मानवतेचा क्रूर चेहरा दिसून येतो. महासत्ताहोण्यासाठी,  जगावर साम्राज्य करण्याच्या हव्यासा पोटी बायोवेपनचा उपयोग करायचा, हजारॊ लोकांना एकाच वेळी जीवघेण्या रोगाची लागण झाली कि भीतीचे सावट पसरेल, आरोग्य दृष्ट्या कमकुवत असलेले हजारो लोक मृत्यमुखी पडतीलआणिया सर्वांचा परिणामअर्थव्यवस्थेवर होऊन अनेक देशआर्थिक मंदीत लोटले जातील. मगआपणच जागतिकअर्थव्यवस्थेचे सम्राट होऊ हि कामनाचं खूप विद्वेषी आहे.


मानवावरअमानवीयरित्या राज्य करण्याचा कालखंड खूप मर्यादित असतो. आणि एक दिवस मानवता जागी होऊन जिंकणारच असते. असेच काहीसे चित्रआजआपल्याला बघायला मिळते. कोरोनाचा जिथे प्रारंभझाला आणि ज्यांनी तो जगभर पसरविण्यात हातभार लावला त्या चीन देशाबद्दल इतर देशवासीयांच्या मनात आकस आहे. चीनमधील उद्योगधंदे काढून घेऊन त्याच प्रमाणे चिनी उत्पादनांच्या वापरावर बंदी आणून तो राग प्रगट होत आहे. जगाच्या लोकसंख्येच्या तुलनेत अठरा टक्के लोकसंख्या असलेला चीन अतिशय कपटाने महासत्ता बनून जग ताब्यात घेण्याचे स्वप्न बघतो, कोरोनाने दाखवलेला मानवतेचा हा विद्रुप चेहराआहे.

 

चीनवर ठपका ठेवल्या जाऊ शकतो कारण कोवीड-१९ प्रमाणेच जीव घेणारे पाच विषाणूंची जन्मभूमी चीनच आहे याचे पुरावे सुद्धा आहेत.

१. फेब्रुवारी-१९५७ मध्ये H2N2 वायरसचा रुग्ण चीनमधील गुइझोऊ प्रांतातआढळला. तेथून हाआजार जगभर पसरला. भारतात अंदाजे एक लक्ष लोक संक्रमित झाले. एकट्या अमेरिकेत दीडलाखांपेक्षा जास्त लोक बळी पडले. (संदर्भ - सेंटर फॉर डी जी जे स कंट्रोल अँड प्रिव्हेंशन - USA) हा आजारआशियाई फ्लू म्हणून जगभर ओळखला जातो.

२. १९६८ मध्ये H3N2 वायरसमुळे हाँगकाँग फ्लूचा उद्रेक झालाआणि जगभरातील जवळपास दहा लाख लोकांना जीव गमवावा लागला. H3N2 वायरस प्रचंड वेगाने आशिया, अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलियामध्ये पसरला. हा रोग इन्फ्लुएंझा-A म्हणून ओळखला जातो.

३. १९९७ साली हाँगकाँग मध्ये बर्ड फ्लू चा वायरस HPAI A(H5N1) सर्व प्रथम बदकांमध्येआढळून आला. नंतरआफ्रिका, आशिया, युरोप मधील देशांमध्ये कोंबडी, बदके आणि इतर पाळीव पक्ष्यांमध्ये फ्लूचे संक्रमण आढळून आले. या पक्षांच्या दीर्घकाळ सान्निध्यात आलेल्या लोकांनाच या फ्लूचे संक्रमण झाले आणि मृत्यूला कारणीभूत ठरले.

४. २००२ मध्ये SARS-CoV-1 हा वायरस दक्षिण चीन मधील मांस बाजारातील मांसामध्ये आढळला. युनान प्रोव्हिन्स मधील एका गुहेतील वटवागुळांमुळे या वायरसचे संक्रमण झाले. या वायरसमुळे जवळपास ८०० लोकांना जीव गमवावा लागला आणि काही ३७ देशांमध्ये याचे संक्रमण झाले होते.

आताचा वुहान कोरोना वायरस SARS-CoV-1 ह्या वंशावळीतलाच आहे आणि त्याला SARS-CoV-2 असे म्हंटल्या जाते. दोन्ही संक्रमणांची लक्षणे इन्फ्लुएंझा सारखीच आहे.

५. २०१७ मध्ये चीनच्या शांघाईमधील पोल्ट्री बाजार मधील पक्ष्यांमध्ये A H7N9 वायरस आढळला. या वायरस मुळे जास्त मनुष्यहानी झाली नाही तरीही या एविएन इन्फ्लुएंझा मध्ये महामारीची क्षमताआहे.

या वरून असे दिसून येते कि अनेक विनाशकारी रोगजंतूंची जन्मभूमी चीनच आहे.

 

सामान्य माणूस आज एकमेकांकडे संशयाने बघतो आहे. विलगीकरण हा या रोगावरील प्रतिबंधात्मकउपायांपैकी एक आहे. नवीन आजार म्हणून लसीकरण आणि औषधांवर संशोधन सुरु आहे. उपचारात्मक उपाय म्हणून मलेरियाची औषधे जसे हायड्रोक्लोरोक्वीन आणि क्लोरोक्वीन, अँटीवायरल ड्रग, रेमेडीसीवर, इत्यादी दिले जात आहेत. कोरोना संक्रमित रोग आहे म्हणून त्याचा प्रसार वेगाने होत आहे. माणसांनी एकमेकांपासून अंतर ठेऊन व्यवहार करावे असा सरकारचाआदेशआहे. आपण बघतो किअनेक दवाखाण्यांमधून विलगीकरणाचे ओझे न बाळगता डॉक्टर रुग्णांवर उपचार करीत आहे. संक्रमण टाळण्यासाठी त्यांना PPE म्हणजेच पर्सनल प्रोटेक्टशन इक्वीपमेन्ट, आय प्रोटेक्टशन, मेडिकल मास्क, मेडिकल हँडग्लोव्हस, प्रोटेक्टिव्ह गाउन, सॉक्स आणि शूजअश्या वेशात तासंतास रुग्णांवर उपचार करावे लागतात. त्यांच्यासोबत असलेल्या परिचारिकांचेही असेचआहे. आज डॉक्टर आणि परिचारिका, त्यांचे मदतनीस हे सर्व रुग्णांचे तारणहार बनले आहे. त्यांच्या या नि:स्वार्थ सेवेसाठी त्रिवार वंदन! डॉक्टर या चेहऱ्याचे जितके आभार मानावे तितके कमीच आहे.

मला एका घटनेचा उल्लेख करावासा वाटतो. आमचे एक जवळचे नातलग जे सध्या लंडन मध्ये कोरोनावर उपचार घेत आहे. अतिशय हसतमुख बुद्धिमान व्यक्तिमत्व आहे. बुलढाणा जिल्ह्यातील एका छोट्या गावात जन्म, अकोल्या मध्ये शिक्षण, अमरावती शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून ME कॉम्पुटर, मुंबईमध्ये नोकरीनंतर पुढे लंडन मध्ये IT कंपनीमध्ये नोकरी असा त्यांचा यशस्वी प्रवास आहे. त्याच बरोबर उच्च रक्तदाब आणि वजनदार शरीर अश्या कुरबुरीआहेत. लंडनमध्ये कोरोनाचा भयंकर असा उद्रेक सुरु आहे. ह्यांच्या IT कंपनीतही कोरोना बाधित वावरत होते. कारण तिथे खूप उशिरा लॉकडाऊनला मान्यता मिळाली. घरात राहून काम सुरु असतानाच त्यांना सर्दीखोकल्याने ग्रासले. उपचार करूनही थांबेना. मग ताप जोर धरू लागला. कोरोनाचा संशय आला म्हणून ऍम्ब्युलन्स बोलावली. टेस्ट झाल्या आणि त्या कोरोना पॉसिटीव्ह आल्या. आम्हा सर्व नातलगांना खूप वाईट वाटले आणि काळजी पण वाटत होती. गावामध्ये पूजा, महा मृत्युन्जय जप आणि होमहवनाला सुरुवात झाली. आम्ही देवाजवळ प्रार्थनाकरीत होतो. उच्च रक्तदाबाचा त्रास असल्यामुळे उपचारात काही अडचणी येऊ नये म्हणून त्याना ऍनेस्थेशिया दिला जात होता. जवळपास एक महिना ते व्हेंटिलेटरवर ICU मध्ये होते. जवळ कोणी नाही. डॉक्टर फक्त तब्येतीत काही सुधारणा झाली तर त्यांच्या पत्नीला फोन करून कळवायचे. मध्यंतरी एकदा ऍनेस्थेशिया उतरल्यावर त्यांना ते स्वतः कुठे आहेत याची जाणीव झाली. सभोवताली नखशिखांत बंद असलेले रहस्यमय वेषातले डॉक्टर आणि सहकारी आणि स्वतःच्या शरीरावरील उपचार करणारी वैद्यकीय साधने बघून त्यांचा राग अनावर झाला. आणि रक्तदाब वाढला. ताबडतोब ऍनेस्थेशिया देऊन त्यांना शांत करण्यात आले. पण नंतर डॉक्टरांनीच स्वतः त्यांना सर्व उपचार पद्धती आणि त्यातील अडचणी या सर्व गोष्टी समजावून सांगितल्या. त्यानंतर आमचे नातलग सर्व गोष्टींना धैर्याने सामोरे गेले. आणि एक दिवस दवाखाण्यातून एक व्हिडीओ प्रदर्शित करण्यात आला. व्हिडीओ मध्ये त्यांना ICU मधून रुग्ण शिबिकेवर खाजगी कक्षात नेण्यात येतआहे असे दिसत होते. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि हास्याचा संगम दिसत होता. दवाखाण्यातील सर्व कर्मचारी आणि डॉक्टर्स टाळ्यावाजवून अभिनंदनकरीत होते. आमचे नातलग झोपल्या झोपल्याच "Thank You" म्हणत अभिनंदन स्वीकारत होते. सारे दृश्य बघून आम्ही कृतकृत्य झालो. देवाची कृपा म्हणून हात जोडले. त्यानंतर त्यांच्याजवळ मोबाईल देण्यात आला. पण भेटण्याची कोणालाही परवानगी नव्हती. आठ दिवसांनंतर त्यांचा आम्हाला व्हिडीओकॉल आला. समोरासमोरआम्ही त्यांच्याशी बोललो. कोरोनाच्या सध्याच्या परिस्तिथीविषयी त्यांना खूप काळजी वाटत होती. त्यांच्याच शब्दात "हे खूप भयंकर आहे, मी ऍडमिट झालो त्या दिवशी इतर चार रुग्ण ऍडमिट झाले. पाच रुग्णांमध्ये माझ्या आजूबाजूचे चार देवाघरी गेलेत. खरोखर हे खूप भयंकर आहे. तुम्ही काळजी घ्या." आता त्यांना खूपअशक्तपण आला आहे. तब्येत हळूहळू सुधारत आहे. काही दिवसातच त्यांना डिस्चार्ज मिळेल आणि ते घरी येतील. मला वाटतं, सभोवताली मृत्यू बघत, जीवघेण्या रोगावर मात करणारे किती धैर्यवान आहेत. आणि रुग्णांना समजावणारे डॉक्टरही किती संयमी आणि कर्तव्य दक्ष आहेत.

कोरोनाने आपल्याला फक्त वाईट गोष्टीच दाखवल्याअसे नसून बऱ्याच सकारात्मक घटनाही दाखवल्या आहेत. लॉकडाउन काळात वाहनांची वाहतूक कमी झाली आणि कारखाने बंद असल्यामुळे हवेची प्रदूषण पातळीखाली गेली आहे. कधी नव्हे ते निसर्ग शुद्ध श्वास घेतआहे. मला वाटतं, तो आपल्याला सांगत आहे कि निसर्गाचे वाण पदरात पाडून घ्यायचे असेल तर त्याच्या कार्यपद्धतीत अडथळे आणू नका. चीनने जसे त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयीनुसार भूक भागविण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात एकाच प्रकारच्या प्राण्याचे पालन केले. मोठ मोठाली बाजारपेठ उभारून मांसाची विक्री केली. पण माणसाचे आरोग्य आणि स्वच्छता या कडे दुर्लक्ष केले. परिणामी वेगवेगळ्या प्राणी पक्ष्यांकडून नवे नवे रोग संक्रमित करून घेतले. असे अनेक प्रकारचे चांगले वाईट, आपल्याला काही शिकवण देणारे चेहरे या कोरोनाने समोर आणले आहेत.आज एक सुविचार वाचला - "पृथ्वीवर आपण पाहुणे आहोत हे ज्याला समजले त्यानेच खरे जीवन जगले !"

साधना डोरलीकर

माजी मुख्याध्यापिका