स्वास्थ्य बोध

स्वास्थ्य बोध

लाघवं कर्मसामर्थ्यं दीप्तोऽग्निर्मेदसः क्षयः।
विभक्तघनगात्रत्वं व्यायामादुपजायते ।।

व्यायामापासून अंग हलके होते, काम करण्याचे सामर्थ्य येते, भूक वाढते, वात झडतो व शरीर रेखीव, पिळदार व कणखर होते.

लाईफस्टाईल डिसिझेस अशा नावाने ओळखल्या जाणाऱ्या अनेक आजारांचे मूळ हे अती खाणे व व्यायामाचा अभाव या दोन गोष्टींमध्ये आहे. वाग्भटाने अष्टांगहृदय या ग्रंथातील दुसऱ्या अध्यायात आदर्श दिनचर्या सांगताना हा श्लोक विशद केला आहे. उच्च रक्तदाब, मधुमेह, स्थुलपणा, यकृताचे आजार, पचन विकार, अस्थि व सांध्यांचे रोग इत्यादी सर्व टाळणे व आटोक्यात ठेवण्यासाठी व्यायामाला पर्याय नाही ! सर्व साध्यांचे जे प्रमुख साधन ते शरीर, व्यायामानेच राखता येते. प्रकृती व ऋतुमानानुसार कोणी, किती व्यायाम करावा याचेही मार्गदर्शन आयुर्वेदाने केले आहे. अती व्यायाम हानिकारक असतो. याचा आवर्जून उल्लेख ग्रंथकाराने केला आहे.