सेवांकुर टिमटाळा शिबीर वृत्तं

दिनांक 27 व 28 ऑगस्ट रोजी अमरावती सेवांकुर द्वारा संवेदना सेवा प्रकल्प टीमटाळा येथे दोन दिवसांचे निवासी शिबिर आयोजित करण्यात आले होते . श्रद्धेय एकनाथजी रानडे यांच्या जन्मगावी डॉ हेडगेवार हॉस्पिटल अमरावती द्वारा चालवण्यात येणाऱ्या संवेदना प्रकल्पच्या वास्तूत , अतिशय निसर्ग रम्य वातावरणात हा वर्ग संपन्न झाला .अमरावती व मोझरी येथील सर्व वैद्यकीय महाविद्यालयातील जवळपास 50 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला . सेवांकूर ही संस्था वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या मनात सेवा भाव जागृत व्हावा व समजासाठी दातृत्वाचा भाव असणाऱ्या डॉक्टरांची पिढी तयार व्हावी या साठी अनेक उपक्रम आयोजित करते .


शिबिराची सुरुवात मैदानी खेळ व प्रार्थनेने झाली . डॉ यशोधन बोधनकर , डॉ अपर्णा सदाचार , महेश जोग , अजय श्रॉफ यांच्या हस्ते वर्गाचं उद्घाटन झालं व मान्यवरांनी उपस्थित विद्यार्थ्यांना सेवांकुरच्या उपक्रमाबद्दल माहिती दिली . रात्री एकनाथजी रानडे यांच्या जीवनपटावर आधारित व विवेकानंद शिला स्मारक उभारणीच्या संघर्षावर प्रकाश टाकणारी एक चित्रफीत दाखवण्यात आली . दुसऱ्या दिवसाची सुरुवात शारिरीक व्यायाम , सूर्यनमस्कार व मैदानी खेळांनी झाली . श्रमदान म्हणून विद्यार्थ्यांनी परिसरात वृक्षारोपण देखील केले . प्रथम सत्रात प्रद्या प्रबोधिनी छात्रावासचे अध्यक्ष अविनाशजी देशपांडे यांच्या कार्याबद्दल मुलाखती द्वारे माहिती मिळाली . चैताली शेंडे व साक्षी वाघ यांनी त्यांची मुलाखत घेतली . त्यांच्या कळकळीच्या आवाहनाने सर्व विद्यार्थी प्रेरित झाले . पुढील सत्र तरुण वक्ता अक्षय चंदेल यांनी धर्मिर छत्रपती संभाजी राजेंचा रोमहर्षक इतिहास सांगत आपल्या विशेष शैलीत विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण केला . तृतीय सत्र प्राध्यापक सूरज हेरे यांनी संवाद कौशल्य हा विषय अत्यंत खेळीमेळीचे वातावरण ठेवत हा विषय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला .सामजिक , राष्ट्रीय विषयावर चर्चा व्हावी म्हणून विद्यार्थ्यांची गटात विभागणी करून विविध विषयांवर चर्चा घडवण्यात आली . चर्चित मुद्दे विद्यार्थ्यांनी मान्यवरांसमोर मांडले . अशा या उत्साहपूर्ण त्याच बरोबर ज्ञानवर्धक वर्गाची सांगता दत्तात्रय रत्नपारखी यांच्या उद्बोधनाने झाले . कार्यक्रमाचं संचालन आशुतोष मुधोल व प्रणाली टेकाडे यांनी उत्तमरित्या केले . वर्गाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सेवांकुर अमरावतीच्या संपूर्ण चमूचे खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !!

-

शर्वरी जोशी