चलो जलाये दीप वहाँ जहाँ अभी भी अंधेरा है !

या ओळींना मुर्तमंत स्वरूप देण्यासाठी आमची सेवांकूर अमरावतीची टीम येवून पोहोचली होती दिवाणखेड गावाजवळ वसलेल्या पारधी बेड्यावर . बेडा ? पारधी ? या सगळ्या विषायांबद्दल माझ्या तथाकथित व्यस्त दिनचर्येत विचार करायला देखील वेळ नव्हता.

आज हीच संधी प्रद्या प्रबोधिनी आणि सेवांकुर च्या निमित्याने चालून आली . इथे पोहोचताच आम्हाला दिसलं की छोटी छोटी मुलं , त्यांना खेळवणारी त्यांची आई , डोळे कीलकीले करून पाहणारी आजीबाई आमची वाट बघत होते .शिवभावे जिवसेवा या तत्वला आचरणात आणणऱ्या खुद्द स्वामीजींच्या नावावर अंकित झालेला दिग्विजय दिवसाचं अवचित्त होतं आणि म्हणूनच कदाचित एक वेगळीच उर्गा वातावरणात निर्माण झाली होती. अगदी सहज आम्ही त्यांच्यात आणि ते आमच्या गप्पांमध्ये सामील झाले .त्यांच्या सोबत एकाच चटई वर बसून त्यांच्याशी गप्पा मारत होतो , त्यांची भाषा नीट ऐकुन समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो. सगळे भरभरून बोलत होते . सामाजिक समरसताचे धडे या अधिक आणखी कुठे गिरवायला मिळतील ? कुठे अनुभवयाला मिळेल ?

 बेड्यावर असलेले त्यांची घरे अगदी जवळून बघत होतो . अन्न, वस्त्र , निवारा या सारख्या अगदी मूलभूत गरजा सुद्धा रोज उपलब्ध होईल की नाही याची खात्री नाही तिथे आधुनिक युगाचे कुठले दाखले देणार ? प्रशांत दादा बोधनकर सरांचे आभार मानताना म्हणाले " सरांनी नेहमीच आमच्यासाठी खूप केलंय " त्यावर बोधनकर सर अगदी सहज म्हणून गेले " अरे कोणीच कोणासाठी करत नसत , सगळे एकमेकांसाठी करत असतात ." आपल्या संस्कृतीत सांगितल्या प्रमाणे एक व्यक्ती जो समजाचा मूलभूत घटक असतो तो एकमेकांपासून वेगळा नसून एकमेकांशी केंद्रित वर्तुळाच्या ( concentric circles) माध्यमातून नव्हे तर एकाला एक जोडत वेटोळे घेत घेत वर्तुळ रुपी समाज अधिकाधिक विस्तृत होत जातो , अर्थात एकमेकांच्या सहकार्याने समृद्ध होत जातो !!

 निघताना आमच्या सगळ्या तक्रारी , अडचणी , दुःख आम्हाला खूप खुज्या वाटत होत्या . सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे जगण्याचा एक नवीन आणि सकारात्मक दृष्टीकोन आम्हाला मिळाला जो कायम आमच्या प्रवासात शिदोरी स्वरूपात सोबत असेल.....

दीन हीन सेवा ही परमेष्टी अर्चना
केवल उपदेश नही कर्मरूप साधना
मन वाचा कर्म से सदैव एक रूप हो....!

शर्वरी जोशी